नववीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित!

By admin | Published: July 5, 2017 07:27 PM2017-07-05T19:27:15+5:302017-07-05T19:27:15+5:30

शिक्षण विभागाची उदासीनता: पालकांची धावपळ

Ninth students are deprived of books! | नववीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित!

नववीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित!

Next

किशोर मापारी / लोणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इयत्ता नववीचा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात बदलला असून नवीन पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध नसल्याने पालकांची तारांबळ उडत आहे.तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.
शैक्षणिक सत्राला २७  जूनपासून प्रारंभ झाला असला तरी अद्याप बाजारात नवीन पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके मिळत नसल्याने पालकांची धावपळ होत आहे. बाजारपेठेत आवश्यक तो पाठ्यपुस्तकांचा साठा का उपलब्ध झाला नाही आणि तो उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाने काय प्रयत्न केले , असे प्रश्न पालकांतून उपस्थित केल्या जात आहेत. जीएसटी कर प्रणालीचा धसका घेतलेल्या विक्रेत्यांनी पाठ्यपुस्तके मागविली नाहीत कि पुस्तके उपलब्ध नाहीत या प्रश्नाची उत्तरे शिक्षण विभागाला देणे गरजेचे आहे. शाळा प्रवेश आणि पाठ्यपुस्तकांची खरेदी यामध्ये पालकवर्ग पिळवटून निघत आहे.परंतु या दोन्ही मुद्यावर शिक्षण विभागाकडून काहीही हालचाली होत नाहीत , अशी खंत व्यक्त होत आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले नाही. यावरून पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत मंडळच उदासीन दिसून येत आहे. पुस्तकांची उपलब्धता नसण्यामागची कारणे काय , यासंदर्भात शिक्षण विभागाणे भूमिका स्पष्ट करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके उपलब्ध होतील , यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे.

पाल्याची मागणी पूर्ण होत नसल्याची पालकांची खंत
शैक्षणिक सत्राचा आठवडा उलटत असताना पाल्य दररोज पाठ्यपुस्तकांची मागणी करीत आहेत.पालकही पाल्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज बाजारात पाठ्यपुस्तकासाठी दुकानांमध्ये चकरा मारत आहेत. परंतु पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पाल्यांच्या नाराजीला पालकांना सामोरे जावे लागत आहे.

पुस्तके उपलब्ध नाहीत याबाबत काहीही तक्रार आलेली नाही. पुस्तके उपलब्ध नसतील तर त्यासंदर्भात पाठ्यपुस्तक मंडळाशी बोलावे लागेल .
- एन.के.देशमुख, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

 

Web Title: Ninth students are deprived of books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.