बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:55 PM2017-09-12T23:55:38+5:302017-09-12T23:55:38+5:30

दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

Nirmari Parishad for the vaccine of Buldhana district! | बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

Next
ठळक मुद्दे हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
येथील पत्रकार भवनमध्ये निर्धार परिषदेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आ. राहुल बोंद्रे, वृषाली बोंद्रे, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, पंजाब गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना आ. बोंद्रे म्हणाले की, राष्ट्रमाता माँ जिजाऊंना जन्म देणार्‍या मातृतीर्थ जिल्ह्यात सध्या गावागावामध्ये दारू विक्रीचा उच्चांक निदर्शनास येत आहे. या दारूच्या व्यसनामुळे माता भगिनी त्रस्त आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषद आयोजित केली असल्याचे आ. बोंद्रे यांनी सांगितले. १५ सप्टेंबर रोजी या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होईल. 
आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, बुलडाणा नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम यांची उद्घाटन समारंभात उपस्थिती राहणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ‘हिरकणी’च्या संस्थापक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे राहतील. 
या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आ. राहुल बोंद्रे, नरेंद्र लांजेवार, प्रेमलता सोनुने, गणेश वानखेडे, सुनीता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाब गायकवाड, मनजितसिंग शीख, ज्योती बियाणी, शोभा सवडतकर यांनी केले आहे.

Web Title: Nirmari Parishad for the vaccine of Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.