देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:24 PM2019-02-15T22:24:14+5:302019-02-15T22:24:50+5:30

देशसेवेसाठी आपण स्वत: तथा शहीद झालेल्या आपल्या भावाच्या मुलासह आपलीही दोन्ही मुले देशसेवेसाठी कायम सज्ज राहू.

Nitin Rathore's brother Praveen's feeling Jawan martyred | देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

Next

लोणार/बिबी:  देशसेवेसाठी आपण स्वत: तथा शहीद झालेल्या आपल्या भावाच्या मुलासह आपलीही दोन्ही मुले देशसेवेसाठी कायम सज्ज राहू. शत्रुला परास्त करण्यासाठी प्रसंगी कोणतेही शस्त्र चालविण्यास आपण मागे हटणार नाही. शहिदांची आपल्याकडे परंपरा आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील शहीद झालेले सीआरपीएफचे जवान नितीन राठोड यांचे ३१ वर्षीय बंधू प्रवीण शिवाजी राठोड यांनी दिली.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्येच आतंकवादी का जन्माला येतात. आज राग व्यक्त होत असला तरी आपली तिन्ही मुले देशसेवेमध्ये आपण लावू. येणार्या काळात प्रसंगी देशासाठी कुठलेही हत्यार उचलण्यास आपण सज्ज आहोत. आपली दोन्ही व शहीद भावाचा जीवन हा मुलगा असे तिघेही देशसेवेसाठी आपण देण्यास तयार आहोत. आपण स्वत:ही त्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहोत. शासनाने फक्त तीनही मुलांसह आपणास सैन्यात घेण्याचे आश्वासन द्यावे. प्रसंगी बॉन्ड पेपरवर ही आपण लिहून देण्यास तयार आहोत. या आत्मघातकी हल्ल्यानंतरही सैन्याची इच्छा शक्ती प्रबळ आहे. ती तसूभरही कमी झालेली नाही. सैन्याची इच्छा शक्ती अधिक प्रबळ व्हावी, त्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शहीद झालेले आपले बंधू हे स्वत:च्या हिंमतीवर सैन्यात भरती झाले होते. एका चूकून त्यांचा युनिफॉर्म आपण अंगावर चढवला होता. तेव्हा तो माझा
युनिफॉर्म आहे. तुझ्यात ताकद असले तर स्वत: भरती होऊन दाखव व युनिफॉर्म घाल असे त्यांनी आपणास सांगितले होते, अशी भावनिक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. आजही जर आदेश दिला तर आपण सैन्यात जाऊ असे प्रविण राठोड म्हणाले.

ठोस उपाययोजना करा
सध्या काय चालल आहे हे  हाताला आणि कमळाला चांगल माहिती आहे. त्यात आपल्याला पडायचे नाही. मात्र सर्वांनी मिळून आता हे सगळ थांबवल पाहिजे. सैन्याला ताकद देऊन त्यांची इच्छा शक्ती अधिक प्रबळ केली जावी, असे ते म्हणाले.

ठेचा भाकर खाऊन ८० किलो वजन उचलायचे
अवघी दीड एकर शेती आमच्याकडे होती. आपणही शारीरिक सक्षम व तंदुरुस्त व्हावे यासाठी शहीद नितीन राठोड यांनी आपणास जीमचे साहित्यही खरेदी करून दिले होते. साधी ठेचा भाकर खावून आम्ही ८० किलो वजन उचलायचो. आज मनात काय व्याकुळता आहे हे सांगता येत नाही. पण प्रत्येक जवानात मला माझा भाऊ दिसतो. सैन्यावर भ्याड हल्ला करणार्या अतिरेक्यांविरोधात ठोस कारवाई होणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.

Web Title: Nitin Rathore's brother Praveen's feeling Jawan martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.