आधारकार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:10+5:302021-03-09T04:37:10+5:30

पूर्वीप्रमाणे दारोदारी फिरून भीक मागणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झालेली आहे. मात्र, आठवडा बाजार, शासकीय कार्यालयांपुढे, बँकांसमोर, बसस्थानक आणि मंदिराशेजारी ...

No Aadhaar card; How to vaccinate beggars? | आधारकार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

आधारकार्ड नाही; भिकाऱ्यांना लस कशी देणार?

Next

पूर्वीप्रमाणे दारोदारी फिरून भीक मागणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झालेली आहे. मात्र, आठवडा बाजार, शासकीय कार्यालयांपुढे, बँकांसमोर, बसस्थानक आणि मंदिराशेजारी बसून भीक मागणारे वयोवृद्ध महिला-पुरुष आजही दिसून येतात. त्यांचा अनेकांशी संबंध येतो. त्यामुळे हा घटकही कोरोनापासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश भिकाऱ्यांकडे आधारकार्ड नाही. यामुळे त्यांना लस कशी मिळणार, असा प्रश्न आहे.

भिकाऱ्यांची निश्चित आकडेवारी नाही

मोठ्या शहरांत भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वास्तविक पाहता भीक मागणे व देणे गुन्हा आहे. त्यामुळे ‘भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५८’अंतर्गत भिकारीमुक्त मोहीम राबविण्यात येते. असे असले तरी बुलडाणा जिल्ह्यात भिकाऱ्यांची निश्चित संख्या किती, याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आधारकार्ड नाही, त्यांचे लसीकरण कसे होणार?

कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्याची सर्वाधिक भीती ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात त्यांचा प्राधान्याने लसीकरणासाठी विचार झाला.

वयोवृद्ध भिकाऱ्यांची बुलडाणा शहरासह जिल्ह्यातही संख्या अधिक आहे. त्यामुळे ते कोरोनापासून सुरक्षित होणे गरजेचे आहे. मात्र, संबंधितांकडे आधारकार्ड नसल्याने आणि ते बंधनकारक असल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार, हा प्रश्न आहे.

मंदिरांजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक

० बुलडाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, चिखली शहरात गजानन महाराज मंदिर, राममंदिर, देवीचे मंदिर, याठिकाणी बसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

० गत वर्षभरात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मंदिरे बंद राहिल्याने भाविकांचे दर्शनासाठी येणे कमी झाले. परिणामी, भिकाऱ्यांना रोख स्वरूपात मिळणारी भीकही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

० अशात आधारकार्ड नसल्याने त्यांचा लसीकरणासाठीदेखील विचार केला जाणार नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे.

भिकाऱ्यांनाही लस मिळणे आवश्यक आहे. आधारकार्ड नसलेले व भीक मागून पोट भरणाऱ्यांचा शासनाने सर्व्हे करावा. त्यासाठी दिव्या फाउण्डेशनचे पूर्ण सहकार्य राहील.

- अशोक काकडे,

अध्यक्ष, दिव्या फाउण्डेशन, बुलडाणा.

Web Title: No Aadhaar card; How to vaccinate beggars?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.