रस्त्यावरचे डांबरही सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:50+5:302021-06-09T04:42:50+5:30
रस्ता डांबीकरणाचा होता का? धाड भागात चांडोळ हे एक मोठी लोकसंख्या आणि व्यापारी केंद्र असलेले गाव आहे. येथे प्राथमिक ...
रस्ता डांबीकरणाचा होता का?
धाड भागात चांडोळ हे एक मोठी लोकसंख्या आणि व्यापारी केंद्र असलेले गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, काॅलेज, बँक, विविध सार्वजनिक सेवा केंद्रे आहेत. विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी चांडोळ येथे ये-जा करावी लागते. परंतु या गावाला जोडणारा महत्त्वपूर्ण धाड-चांडोळ रस्ता मागणी काही वर्षांत रहदारीच्या कामाचा राहिलाच नाही. आता हा रस्ता डांबरीकरणाचाच आहे काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो.
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीही उपाययोजना केली नसल्यामुळे आज पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीकरता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.