मेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:33 PM2018-04-20T13:33:07+5:302018-04-20T13:33:07+5:30

मेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

No cash in ATM in Mehkar city | मेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध

मेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर शहरातही विविध राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम असून या एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे. लग्नसराईच्या दिवसात सर्वसामान्य जनतेला सध्या पैशाची गरज असताना एटीएममध्ये मात्र कधीच पैसे राहत नाही.

मेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नोटाबंदीनंतरचा काळ लोटत नाही तोच भारतातील अनेक राज्यात चलन टंचाईला सामोरे जावे लागले. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावामध्ये एटीएम आहे.  मेहकर शहरातही विविध राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम असून या एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे. एैन लग्नसराईच्या दिवसात सर्वसामान्य जनतेला सध्या पैशाची गरज असताना एटीएममध्ये मात्र कधीच पैसे राहत नाही. त्यामुळे बँक धारकांनी सर्वसामान्यांचे हित जोपासत एटीएममध्ये पैशाचा भरणा करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर व काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कलीम खान, भिमशक्तीचे कैलास सुखदाने, सेवा दलाचे सरचिटणीस शैलेश बावस्कर, विनोद पºहाड, नगर सेवक तोफीक खान, राजराम वाटसर, अजगर शेख, संजय वानखेडे, युनुस पटेल, अब्रास खान मिली, जावेद खान, कुंडलीक देशमुख, नावेद खान, किशोर मरकड, वशिम बागवान, रियाज कुरेशी, एकनाथ अंभोरे, सय्यद हाफीज, महम्मद अफसर, राजु पुंजाने, शे.करीम, सय्यद याकुब आदी काँग्रेसचे कार्यकते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: No cash in ATM in Mehkar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.