बोर्डाच्या परीक्षेला आता उशिरा येणार्यांना ‘नो एंट्री’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:00 AM2017-12-05T01:00:37+5:302017-12-05T01:03:32+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २0१८ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या परीक्षेला ‘लेटकर्मस’ विद्यार्थ्यांना आता अकरानंतर परीक्षा कक्षात प्रवेश मिळणार नाही. परीक्षेत होणार्या गैरप्रकारास आळा बसावा म्हणून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
नानासाहेब कांडलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २0१८ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या परीक्षेला ‘लेटकर्मस’ विद्यार्थ्यांना आता अकरानंतर परीक्षा कक्षात प्रवेश मिळणार नाही. परीक्षेत होणार्या गैरप्रकारास आळा बसावा म्हणून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. अकरानंतर परीक्षेला येणार्या विद्यार्थ्यांना आता त्या दिवशीच्या पेपरला मुकावे लागणार आहे. यापूर्वी पेपर सुरू झाल्यानंतर अर्धा तास उशीर ग्राहय़ धरला जात होता.
अलीकडच्या काळात मोबाइल कार्यरत झाल्यापासून दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला उशिरा येणार्या नवा प्रधात गैरप्रकार करण्याच्या दृष्टीने निर्माण झाला होता. ११ वाजता बोर्डाच्या परिक्षेत्र प्रश्नपत्रिकांचे वाटप झाल्यानंतर त्याचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेऊन ते प्रसारित केल्या जात असे. परीक्षा गृहात येण्यासाठी नियमाप्रमाणे तासाचा अवधी असल्याने तेवढय़ा वेळात प्रश्नाचे उत्तर शोधणे व त्यानंतर परीक्षा केंद्रावर येणे अशी गैरप्रकाराची पद्धत विद्यार्थ्यांनी शोधून काढली होती. यातूनच पेपरफुटी होत असे. तसेच विद्यार्थी संबंधित प्रश्नांच्या उत्तराचे कागद सोबत आणून कॉपी करण्याचे प्रकार घडत असत. हा सर्व विषय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने आता अकरानंतर विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर ‘नो एंट्री’ चा निर्णय शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाने घे तला आहे.प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत सोशल मीडियावर प्राप्त करून काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येऊन पेपर देत असे.
हा प्रकार शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने याला आळा घालण्यासाठी आता अकरानंतर परीक्षेला येणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शांत व तणावमुक्त वा तावरणात परीक्षा देता यावी म्हणून अकराच्या पेपरला १0.४५ वाजता व दुपारी तीनच्या पेपरला २.४५ वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात हजर राहावे, असा नियम आहे; परंतु अनेक विद्यार्थी या नियमांचे उल्लंघन करीत चक्क अकराच्या पेपरला साडेअकरा वाजता व तीनच्या पेपरला साडेतीन वाजता परीक्षा कक्षात येत असे. आधीच्या नियमाप्रमाणे पेपर सुरू झाल्यानंतर अर्धा तास उशिरा येणार्या विद्यार्थ्यांला परीक्षा कक्षात प्रवेश दिल्या जात असे; परंतु सध्याच्या नव्या नियमानुसार अकराच्या पेपरला आता अकरापूर्वीच परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच केंद्र प्रमुखांनाही तसा अहवाल त्वरित वरिष्ठ अधिकार्यांना द्यावा लागणार आहे. म्हणजेच प्र त्येक परीक्षा रूमची अनुपस्थित व उपस्थित परिक्षार्थींंची यादी अकरा वाजण्यापूर्वीच पर्यवेक्षकांना केंद्र प्रमुखास सादर करावी लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पद्ध तीने व्हावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शिक्षण मंडळास दिल्या आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना आता अर्धा तास आधी हजर होणे अनिवार्य आहे. तीन तासांपर्यंंत परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च २0१८ च्या परीक्षेपासून केली जाणार आहे.
- महेश करजगावकर,
अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ