सोयाबीन अनुदान नाही; नांदुरा, मलकापूर, खामगाव तालुक्यातील शेतकरी रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:47 PM2018-10-03T14:47:47+5:302018-10-03T14:48:15+5:30
शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव: सन २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपए अनुदान जाहिर केले होते. याला दोन वर्षे पुर्ण होत आले तरी अद्याप ही प्रक्रीया पुर्ण झाल्याचे दिसत नाही. शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे.
खरीप हंगाम २०१६ -१७ मध्ये राज्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढून उत्पन्न वाढले होते. परंतु बाजारात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहिर केले होते. यासाठी प्रति शेतकरी २५ किवंटल सोयाबीन विक्रीची मयार्दा होती. अनुदान मिळण्यासाठी शेतकºयांनी सोयाबीन विक्री पट्टी, सातबारा, व बॅक पासबूक झेरॉक्ससह अर्ज करावयाचे होते. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीने या अजार्ची छाननी केली होती.
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी २९४९ शेतकरी पात्र ठरले तर ७०२ शेतकरी अपात्र ठरले. पात्र शेतकºयांमधून सुमारे ४०० ते ५०० शेतकºयांच्या कागदपत्रात त्रुट्या असल्याने त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. अशा शेतकºयांची यादी दुरूस्ती करून पाठविण्यात आली असली, तरी अद्याप त्यांना अनुदानाची प्रतिक्षाच आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ८१९६ शेतकºयांनी अर्ज केले. यापैकी सुमारे २६०० अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र शेतकºयांच्या खात्यात १ कोटी ७० लाख ७२ हजार ३१४ रुपए जमा करण्यात आले. परंतु अद्याप ३३ शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अर्ज केलेल्या व यातून पात्र ठरलेल्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याचे संबंधित बाजार समित्यांच्या सचिवांनी सांगितले. दरम्यान याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी जिल्हाउपनिबंधक कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
खामागावात सहाय्यक निबंधक कार्यालयात चेक वाटप
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत पात्र १४ हजार ५९७ लाभार्थ्यांपैकी सुमारे १२ हजार शेतकºयांच्या खात्यात आधीच रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या अजार्तील माहितीत त्रुटी होत्या; त्याची पुर्तता झाली असून खामगाव येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात चेक वाटप सुरू आहे. सोमवारी चेक स्विकारण्यासाठी शेतकºयांची गर्दी दिसून आली.
अपात्र शेतकºयांची संख्या मोठी
सोयाबीन अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी अपात्र शेतकºयांची संख्या मोठी आहे. घाटाखालील सहाही तालुक्यात १८ हजार पेक्षा जास्त शेतकरी अपात्र ठरले आहेत. सोयाबीन विक्री पट्टी व सातबाºयामधिल अथवा बँक पासबूकातील माहितीत तफावत तसेच माल विक्री केलेल्या बाजार समितीत अर्ज न करता इतर बाजार समितीत अर्ज केल्याने अपात्र शेतकºयांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे.