सीबीएसई दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:07+5:302021-02-06T05:05:07+5:30
काय आहे नवीन नियम सीबीएसईसाठी इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित आणि समाजशास्र हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला आता ...
काय आहे नवीन नियम
सीबीएसईसाठी इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित आणि समाजशास्र हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला आता कौशल्य हा विषय देण्यात आला आहे. मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला सहाव्या काैशल्य विषयातील गुण हे नापास झालेल्या विषयासाठी ग्राह्य धरून पास केले जाणार आहे. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयाची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने यंदा मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.
विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयाचा आधार होईल. त्यामुळे विद्यार्थी नापास होणार नाहीत. सेकंड डिव्हिजन त्यांना भेटू शकते. एका विषयामध्ये ६० गुणांपैकी २० गुण हे इंटर्नलचे दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.
गजानन निकस, प्राचार्य, सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकर.
सीबीएसई बोर्डाने नव्या नियमानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी कच्चा असेल तर त्याला या नवीन नियमामुळे चांगली मदत होणार आहे.
प्रशात इंगळे, पालक
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
सीबीएसई दहावीच्या शाळा १८
सीबीएसई दहावीचे एकूण विद्यार्थी १५००