धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:53 AM2017-07-27T01:53:35+5:302017-07-27T01:53:35+5:30

बुलडाणा : शहर परिसरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे; मात्र मागिल तीन वर्षात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

No survey of dangerous buildings! | धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण नाहीच!

धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण नाहीच!

Next
ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात भिंती खचल्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे मुंबई परिसरातील घाटकोपर भागातील एक इमारत कोसळून १२ व्यक्ती ठार झाल्या. त्यामुळे बुलडाणा शहर परिसरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे; मात्र मागिल तीन वर्षात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
बुलडाणा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विदर्भातील खान्देश, मराठवाडा तसेच मध्यप्रदेशाला जोडणारे रस्ते असलेले बुलडाणा शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे इंग्रजांनी आपल्या कामकाजासाठी या ठिकाणी कार्यालय स्थापन केले होते. त्यामुळेच बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. काळानुसार कार्यालये वाढल्यामुळे कार्यालयात काम करणारे व्यक्ती वाढले. परिणामी अनेक कुटुंब बुलडाणा शहरात राहण्यासाठी आले. त्यावेळी थंडी, ऊन, वारा, पाऊसापासून संरक्षण मिळण्यासाठी गवती बंगले बांधण्यात आले. तर जुन्या गावासह अनेक ठिकाणी नवीन पद्धतीने इमारती बांधण्यात आल्या. आज रोजी अनेक ठिकाणी ५०-६० वर्षांपूर्वीचे जुन्या इमारती, बंगले आहेत. काही बंगले बंद पडलेले आहेत तर काही बंगल्यांची दूरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत पालिकेने शहरातील धोकादायक इमारती, बंगले यांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती घोषित करणे आवश्यक आहे; मात्र मागिल तीन वर्षापासून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

जुन्या गावात धोकादायक इमारती
स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांनी बुलडाणा शहरात अनेक देखण्या इमारती बांधल्या होत्या. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, जिल्हाधिकारी यांचा बंगला, पोलीस अधीक्षक यांचा बंगला तसेच इतर खासगी व्यक्तींच्या इमारती, बंगले यांचा समावेश आहे.
त्यातील अनेक इमारती, बंगल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. तर काही धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. अशा अनेक धोकादायक इमारती जुन्या गावात असून, त्याचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती घोषित करून संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे.

धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण मागिल तीन वर्षांपासून झाले नसल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना सूचना दिल्या जातील.
- करणकुमार चव्हाण,
मुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा.

Web Title: No survey of dangerous buildings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.