आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही-ॲड. काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:09+5:302021-08-17T04:40:09+5:30

ऍड नाझरे काजी यांच्या उपस्थितीत बाजार समिती प्रशासकांना सत्कार सिंदखेडराजा: आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही. त्यामुळे संपूर्ण ...

No work remains incomplete if there is confidence-Adv. Qazi | आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही-ॲड. काझी

आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही-ॲड. काझी

Next

ऍड नाझरे काजी यांच्या उपस्थितीत बाजार समिती प्रशासकांना सत्कार

सिंदखेडराजा: आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही. त्यामुळे संपूर्ण विश्वासाने कामे करा असा सल्ला नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझरे काजी यांनी येथे बोलताना दिला.

सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या नवीन प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशासक म्हणून प्रा. मधुकर गव्हाड यांची नियुक्ती झाली असून, १६ प्रशासक निवडण्यात आले आहे. या नवनियुक्त प्रशासकांना सत्कार व पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी काझी बोलत होते. जो रखता है अजम से अपना नाता जोड के, ओ पत्थर से पाणी नीचोड लेता है !! या शायरी ओळींनी काजी यांनी नवीन प्रशासकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीसमोर अनेक समस्या आहेत. परंतु कारभाऱ्यांनी प्रत्येक दिवस हा आपल्या कामाचा शेवटचा दिवस आहे असे समजून काम केल्यास कोणतेच काम आवश्यक राहत नाही. कोणी म्हणत असेल ही उजाड गावची पाटीलकी आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्था मोठ्या प्रगतीत आहेत. याचे गणित समजून घेतल्यास आपली संस्थादेखील मागे राहणार नाही, असेही काझी यांनी सांगितले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष एकनाथ चौधरी, विश्वंभर आप्पा खुरपे, विजय तायडे, शिवाजी राजे, राजेंद्र अंभोरे, सीताराम चौढारी, सतीश काळे, सतीश सरोदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: No work remains incomplete if there is confidence-Adv. Qazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.