अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका!

By admin | Published: March 19, 2016 12:29 AM2016-03-19T00:29:11+5:302016-03-19T00:29:11+5:30

शासनप्रमाणित चाचण्यांना फाटा देत पाण्याचा व्यवसाय बोभाट सुरू.

Nonprofit water risk health risk! | अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका!

अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका!

Next

हर्षनंदन वाघ /बुलडाणा
शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटर कॅन प्रत्येक दुकानात, कार्यक्रमात वापरण्याचे फॅड वाढले आहे. याचाच लाभ घेत शहरात तसेच परिसरातील काही भागांमध्ये अशा शुद्ध पाण्याच्या मोठय़ा कंपन्या उभ्या राहत आहेत. बोअरवेल करून मिनरल वॉटरच्या नावाखाली वॉटर जारमधून बिनबोभाट पाणी विकले जात आहे. अशा अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचा फायदा घेत हा व्यवसाय जोर धरत असल्याचे दिसते. यावर कोणाचेच नियंत्नण नसल्याने हा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्न आहे.
जिल्ह्यात विकल्या जात असलेल्या पाण्याची कधी तपासणी होते अथवा नाही, याची माहिती अन्न व औषधी विभागाच्यावतीने देण्यात आली नाही. जलजन्य आजार याविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. मुळात उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याच्या शुद्धतेची खात्नी नसल्याने या पाण्याचा धोका पत्करायला कोणीही धजावत नाही. त्यामुळे मोठय़ा आस्थापनांना जेव्हा उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाण्याची गरज वाटू लागली, तेव्हा थेट घरपोच पाणी, तेदेखील शुद्ध व थंड करून देता येईल, यावर विचार सुरू झाला; मात्न मिनरल वॉटरचे प्लांट महागडे ठरत असल्याने राज्यातील काही उद्योजकांनी त्यास तुलनेत अगदी कमी किमतीची यंत्रणा तयार करून मिनरल वॉटरला पर्याय दिला.

*फक्त सहा वॉटर प्लांटने घेतले परवाने
शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात मिनरल वॉटरचे प्लांट टाकून पाणी विक्रीचा व्यवसाय झपाट्याने वाढला. हेच पाणी आता हजारो जारद्वारे मिनरल वॉटरचे लेबल मारून ग्राहकांना विकले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा मिनरल वॉटर प्लांटना परवानागी देण्यात आली आहे. त्यात केद्राचे परवाने असलेले चॅस्टिटी बेव्हरेजेस, सोना अँक्वा इंडस्ट्रीज, अजिंक्य बेव्हरेजेस तसेच राज्याचा परवाना असलेले उमाश्री इंडस्ट्रीज, मंगला मागासवर्गीय संस्था यांचा समावेश आहे, तर बहुतांश मिनरल वॉटर प्लांट विनापरवानगी असल्याचे दिसून येत आहे. नियमाप्रमाणे शेतात बोअरवेल करायला परवानगी लागते; मात्न बहुतांश शेतात मिनरल वॉटर प्लांट टाकले आहे. बोअरवेलचे पाणी ग्राहकांना विकले जात आहे. त्यामुळे फुकटात मिळणार्‍या पाण्यावर गुणवत्तेची कोणतीही हमी न देणारा लाखोंनी पैसा कमविण्याचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.

Web Title: Nonprofit water risk health risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.