कापूस खरेदीची तयारीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 04:00 PM2020-10-14T16:00:00+5:302020-10-14T16:00:11+5:30
कापूस खरेदीबाबत जिल्हा प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचा प्रकार घडत आहे.
खामगाव : चालू वषार्त शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे चुकारे वेळेत मिळावे, यासाठी ऑक्टोबरपूर्वि नोंदणी करून खरेदी सुरू करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये नोंदणीही सुरू झालेली नाही तर जिल्हा प्रशासनाकडे कापूस खरेदीची कोणती केंद्र राहतील, याची माहितीही अद्याप पोहचली नसल्याची माहिती आहे.
चालू वर्षात कापूस विक्री प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी केल्याने (भारतीय कापूस महामंडळ) सीसीआयकडून खरेदी प्रक्रीयेला सुरूवात करण्याचे ठरले आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी होणार करण्यासाठी आँनलाइन किंवा आँफलाइन प्रक्रीया सुरू करण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचा प्रकार गेल्या १५ दिवसांपासून घडत आहे. आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेखाली मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करावी लागणार आहे. घाटाखालील तालुक्यांमध्ये कापसाचा पेरा बऱ्याप्ौकी असल्याने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कापूस विक्रीसाठी महाराष्ट्र कापूस पणन महासंघ किंवा सीसीआयला विक्री करण्यासाठी नोंदणीची पद्धत गेल्या काही वर्षात पुढे आली आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणे, तसेच उशिरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागणे, यासारखे प्रकार सातत्याने घडले. तसेच शेतकऱ्यांना कापसाची रक्कम जून, जुलैअखेरपर्यंतही न मिळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. हा प्रकार रोखण्यासाठी कापूस उत्त्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठीची नोंदणी आॅक्टोबरपूर्वीच करण्याचा आदेश शासनाने दिला. त्यानुसार अनेक बाजार समित्यांमध्ये सप्टेंबरच्या दुसऱ््या आठवड्यापासून नोंदणी सुरू झाली. बुलडाणा जिल्ह्यात कुठेही अद्याप नोंदणी सुरू झालेली नाही. त्या शिवाय खरेदी केंद्राची माहितीही मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत जिल्हा प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचा प्रकार घडत आहे.