डीएसके प्रकरणात स्वारस्य नाही! ‘बुलडाणा अर्बन’ने केली भूमिका स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:41 IST2018-02-18T00:33:34+5:302018-02-18T00:41:23+5:30
बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी स्पष्ट केली.

डीएसके प्रकरणात स्वारस्य नाही! ‘बुलडाणा अर्बन’ने केली भूमिका स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी स्पष्ट केली.
गुंतवणूकदारांची २३0 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे अटक करण्यात आली होती. या प्रकरणात प्रारंभी डीएसकेंना अटकेपासून संरक्षण दिले होते; मात्र शुक्रवारी न्यायालयाने ते काढून घेतले होते. त्यापूर्वी आर्थिक अडचणीत आलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मदतीसाठी बुलडाणा अर्बन धावली होती. बुलडाणा अर्बनच्या संचालक मंडळाने डीएसकेंची मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दाखवली होती; परंतु सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहीत नसल्याचेही लक्षात आले होते. त्यातच शनिवारी डी. एस. कुलकर्णी यांना अटक झाल्याने या प्रकरणात ड्यू डिलीजनचा विषयच राहत नाही. वास्तविक काही अटी व शर्थींच्या आधारावर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही मदत करणार होतो; मात्र डीएसके या विषयात बुलडाणा अर्बनला स्वारस्य राहलेले नाही. हा विषय बुलडाणा अर्बनच्या दृष्टीने संपुष्टात आला असल्याचे डॉ. सुकेश झंवर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.