बुलडाण्यातील २३ आरओ प्लांटला नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:08 PM2020-11-17T12:08:27+5:302020-11-17T12:08:34+5:30
अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरात नगर पालिकेची परवानगी न घेता थाटण्यात आलेल्या २३ आरओ प्लांटच्या संचालकांना नगर पालिकेने नाेटीस बजावल्या आहेत. या प्लांटच्या संचालकांना अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत.
शहरात जवळपास २३ आरओ प्लांटच्या माध्यमातून तीन हजार लीटर पाण्याची विक्री हाेत आहे. आतापर्यंत नगर पालिकेची परवानगी घेण्याच गरज नसल्याने अनेकांनी विनापरवानगीच आरओ प्लांट थाटले आहेत. या आरओ प्लांटमधील पाण्याच गुणवत्ताही तपासणी जात नसल्याचे धक्कादायक वास्तव लाेकमतने केलेल्या रियाॅलिटी चेकमध्ये समाेर आले आहे. ग्राहक बनून आरओ प्लान्टला भेट दिली असता तेथील चालकाने आमचे पाणी दर्जेदारच असल्याचे ठासून सांगितले. शिवाय आतापर्यंत कुणाची परवानगीही घेतली नसल्याचेही बिनधास्तपणे सांगितले. नियमानुसार दिवसाला एका ठिकाणावरून दहा हजार लिटर पाणी उपसा आवशयक आहे. आम्ही केवळ दिवसाला तीन ते साडेतीन लीटर पाण्याचा उपसा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड, माळवीर, सागवान आदी ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये कुठे १५ तर कुठे महिना महिना पाणीपुरवठा हाेत नाही. त्यामुळे, अनेक ठिकाणी वाॅटर एटीएम बसविण्यात आले आहे. त्यातील अनेकांनी परवानगीच घेतली असून पाणी तपासण्याची कुठलीही यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे.