शिकस्त इमारत मालकांना बजावणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 03:12 PM2019-07-20T15:12:20+5:302019-07-20T15:12:27+5:30
खामगाव : धोकादायक बनलेल्या शिकस्त इमारतींबाबत नगारिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने न.प. कडून शिकस्त इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. यानंतर सदर इमारतधारकांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : धोकादायक बनलेल्या शिकस्त इमारतींबाबत नगारिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने न.प. कडून शिकस्त इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. यानंतर सदर इमारतधारकांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत.
शहरात अनेक जुन्या इमारती असून यातील काही इमारती शिकस्त झालेल्या आहेत. पावसाच्या दिवसात या इमारती कोसळण्याची भीती असल्याने नागरिकांकडून न.प.कडे तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी बोरीकर यांनी सर्व वार्ड प्युन यांना शिकस्त इमारतींची माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने न.प.चे नगररचना सहाय्यक पंकज काकड यांनी नुकतीच कर्मचाऱ्यांसह प्रभाग क्र.६ मधील गांधी चौक, मेनरोड, टिळक पुतळा, भगतसिंग चौक, नटराज गार्डन, सनी पॅलेस जवळ यासह सराफा भागात शिकस्त इमारतीची पाहणी केली.
या दरम्यान त्यांनी परिसरातील नागरिक तसेच काही इमारत मालकांशी चर्चा केली. सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर इमारत मालकांना सदर शिकस्त इमारती पाडून टाकण्याबाबत नोटीसेस देण्यात येणार असल्याची माहिती काकड यांनी दिली. (प्रतिनिधी)