अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थींना नोटीस!

By admin | Published: September 28, 2016 01:11 AM2016-09-28T01:11:02+5:302016-09-28T01:11:02+5:30

खामगाव पालिकेने २४३ लाभार्थ्यांना नोटीस बजावल्या; दोन हजार ८४ कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय नसल्याची माहिती समोर आली आहे.

Notice to the beneficiaries who do not build toilets without subsidy! | अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थींना नोटीस!

अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थींना नोटीस!

Next

अनिल गवई
खामगाव (जि.बुलडाणा), दि. २७- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या अनुदानातून ११७४ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. दरम्यान, यापैकी बहुतांश लाभार्थींनी सकारात्मक प्रतिसाद न देता, शौचालयाचे बांधकाम थांबविले आहे. अशा २४३ लाभार्थ्यांना नोटीस बजावल्या आहेत.
शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहरांची संकल्पना हाती घेण्यात आलीे. त्यानुषंगाने शहरातील उघड्यावरील हगणदरी आणि शौचालय नसलेल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतर्फे शहरात शौचालय सर्वेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. त्यात शहरातील २८ हजार ९६५ मालमत्ताधारकांपैकी दोन हजार ८४ कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान, वाढती लोकसंख्या गृहित धरून खामगाव शहरासाठी ३२५0 शौचालयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामध्ये संपूर्ण शहरातून ३३३६ नागरिकांनी अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३६0 अर्जांमध्ये त्रुटी असल्याने पर त करण्यात आले. दरम्यान, वर्षभराच्या कालावधीत ३९३ जणांनीच संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे याच लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामाचे पूर्ण अनुदान देण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्ष भराच्या कालावधीत पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त करूनही शौचालय बांधकामात गती न देणारे ११७४ जण पालिकेच्या रडारवर असून, यापैकी २४३ जणांवर आता कारवाईचा फास आवळल्या जाण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने पावलं उचलली असून, विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या सहकार्याने ह्यशौचालयाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा, अन्यथा अनुदान परत करा, तसे न केल्यास मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याच्या नोटीस बजावण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यातील अनुदान घेणार्‍यांच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ!
सद्य:स्थितीत ज्या लाभार्थींना शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले आहे, त्यांच्याकडून काम सुरू झाले आहे किंवा नाही. तसेच सुरू झालेल्या कामांचे छायाचित्रही घेतले जात असून हे काम पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांवर सोपविण्यात आले आहे. जे लाभार्थी अनुदान घेऊनही शौचालयाच्या कामास सुरुवात करणार नाहीत, त्यांच्याकडून अनुदान परत घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे अनुदान परत न करणार्‍या लाभार्थींवर गुन्हेही दाखल करणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

पहिला हप्ता मिळाल्यानंतर शौचालय बांधकाम न करणार्‍या लाभार्थ्यांची शोध मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. शौचालय बांधकाम न करणार्‍यांना मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात नोटीस दिल्या जात आहेत.
- पल्लवी इंगळे
आरोग्य पर्यवेक्षक,
नगर परिषद, खामगाव.

Web Title: Notice to the beneficiaries who do not build toilets without subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.