'द केरला स्टोरी' प्रकरणी एकाला पोलिसांनी बजावली नोटीस
By सदानंद सिरसाट | Published: May 8, 2023 06:06 PM2023-05-08T18:06:01+5:302023-05-08T18:06:35+5:30
शहरातील युवा हिंदू प्रतिष्ठानचे रोहित पगारिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल आहे.
खामगाव (बुलढाणा) : शहरातील एका टाॅकिजमध्ये ‘द केरला स्टोरी’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगावातील एकाला शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे त्यामध्ये बजावले आहे.
शहरातील युवा हिंदू प्रतिष्ठानचे रोहित पगारिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल आहे. त्यावरून पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यामध्ये ७ मे रोजी शहरातील एका टॉकिजमध्ये 'द केरला स्टोरी' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल केलेल्यापोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. खामगाव शहर संवेदनशील आहे, त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर केली जाईल, असे शहरचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.