व्यापाऱ्यांना बजावली नोटीस; खामगाव बाजार समितीत खरेदी प्रभावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:33 AM2021-02-11T11:33:39+5:302021-02-11T11:34:51+5:30
Khamgaon market committee सकाळपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बाजार समितीतील खरेदी बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नोटीस जारी केल्यामुळे व्यापाऱ्यांनी बुधवारी सकाळी खरेदी बंद केली. त्यामुळे सकाळपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बाजार समितीतील खरेदी बंद होती.
खामगाव बाजार समितीच्यावतीने व्यापारी, अडते व खरेदीदारांना दरवर्षी परवाना नुतनीकरण करावा लागतो. ही प्रक्रिया फेबु्रवारी व मार्च महिन्यात होते.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत परवाना नृतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. बाजार समितीच्यावतीने व्यापाºयांना बुधवारी सकाळी नोटीस देण्यात आली. यामध्ये व्यापाºयांना पूर्ण वर्षाचा व्यवसाय, खरेदी, विक्री, अढत, सेस याची माहिती मागितली आहे. मात्र सध्या बाजार समितीत तूर आणि हरभरा खरेदीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे माहिती देणे शक्य नसल्याने व्यापारी व अडत दुकानदार संतप्त झाले. बुधवारी सकाळी व्यापारी व अडत्यांनी काम बंद केले.
दुपारी प्रशासन आणि व्यापाºयांमध्ये चर्चा झाली. यावेळी व्यापाºयांनी दररोज शेतमाल खरेदी व विक्री, अडत, सेसची संपूर्ण माहिती दिल्या जाते. त्यानंतरही वर्षभराची माहिती कशाला हवी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर शेतमालाची खरेदी सुरू झाली.
बाजार समितीतील व्यापाºयांना रेकॉर्ड तपासणीसाठी माहिती मागवण्यात आली. मात्र सध्या खरेदीचा हंगाम असल्यामुळे व्यापाºयांनी नकार दिला. त्यामुळे काही वेळासाठी शेतमाल खरेदी बंद झाली होती. मात्र चर्चेनंतर खरेदी- विक्राचे व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले.
- मुगुटराव भिसे
सचिव,
कृषि उत्पन्न बाजार समिती, खामगाव
दुपारपर्यंत खरेदी बंद
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ तालूकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी शेतमाल घेऊन येतात. बुधवारी सकाळी अनेक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला. मात्र, बाजार समितीत खरेदी बंद होती.
त्यामुळे बाजार समितीमध्ये तसेच बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांनी सकाळपासून तर दुपारपर्यंत खरेदी बंद असल्यामुळे तात्कळत बसावे लागले.