सूचनापेट्या वर्षभरापासून बंदच
By Admin | Published: December 13, 2014 12:22 AM2014-12-13T00:22:27+5:302014-12-13T00:22:27+5:30
बुलडाणा जिल्हा प्रशासनाची अनास्था; अधिका-यांना वेळ नाही.
बुलडाणा : विविध शासकीय योजना, माहितीपत्रक, कर्मचार्यांना व नागरी सूचना जाहीर करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालय जाळीबंद लाकडी सूचनापेट्या लावण्यात आलेल्या आहेत. या सूचनापेट्या व फलक प्रशासकीय कामे आणि नागरी जनसंपर्कचा आरसा समजल्या जाते; मात्र सध्या या सूचनापेट्या उघडून त्यातील कागदपत्रं व सूचना पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही. त्यामुळे गत एक वर्षा पासून शहरातील कुठल्याही शासकीय कार्यालयातील सूचनापेटी उघडली गेले नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उघडकीस आले. प्रशासकीय तक्रारी, सूचना कर्मचारी आणि नागरिकांपयर्ंत पोहोचविण्यासाठी तसेच मंजूर व प्रलंबित निविदांची प्रकरणे दाखविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात जाळीबंद लाकडी सूचना पेट्या (नोटीस बोर्ड) लावण्यात येतात. ही सेवा प्रशासकीय कार्य प्रणालीचा एक भाग म्हणून शासकीय कार्यालयात सुरु आहे. कर्मचार्यांना मिळणार्या सूचना आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवा सुविधेची नियमित दखल या लाकडी सूचना पेट्यामध्ये स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांकडून अद्ययावत होणे अपेक्षीत असते. नेहमी नागरिकांची विविध कामांसाठी वर्दळ असलेल्या शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीमध्ये प्रत्यक्ष जावून या प्रशासकीय कार्यप्रणालीची तडताळणी करण्यात आली. मात्र या सर्व्हेक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाची सुचना पेट्याबाबत असलेली अनास्था पुढे आली आहे.