...आता दुधााळ जनावरांसाठीही ‘आधार कार्ड’; लोणार पंचायत समितीची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:59 PM2017-11-22T13:59:25+5:302017-11-22T14:00:53+5:30
किनगावजट्टू : आता तर शासनाचे वतीने दुभत्या जनावरांकरीतासुध्दा आधारकार्ड आवश्यक असल्याने लोणार पं.स.अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली.
किनगावजट्टू : आतापर्यंत जनतेला कोणत्याही शासकीय कामाकरीता, अंगणवाडीतील मुलापासून तर उच्च शिक्षणापर्यंत आधारकार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता तर शासनाचे वतीने दुभत्या जनावरांकरीतासुध्दा आधारकार्ड आवश्यक असल्याने लोणार पं.स.अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअतर्गंत किनगाव जट्टू येथील पशुवैद्यकीय श्रेणी-२ च्या वतीने परिसरातील दुभत्या जनावरांचे आधारकार्ड काढण्याकरीता १९ नोव्हेंबर रोजी बाराअंकी आधार नंबरची प्लेट गुरांच्या कानात टोचण्यात सुरूवात करण्यात आली. यासोबत जनावरांची व मालकांची संपुर्ण माहितीची दप्तरी नोंद घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य राजेभाऊ इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोणार पं.स.उपसभापती पती निलेश महाजन हे होते. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांचे दवाखान्याचे वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधून पशुधन पर्यवेक्षक डॉ.फोपसे यांनी गुरांना देण्यात येणाºया सोयी सवलती औषधी याबाबत माहिती सांगितली. तर राजेभाऊ इंगळे यांनी दवाखान्याला औषधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव सानप, रामकृष्ण काळबांडे, सैय्यद मकसूद, सैय्यद लुखमान, भिवाजी सौदर, गोविंद आडे, गजानन गायकवाड, राजु सोरमारे, गजानन गायकवाड, भवगान मुळे आदी नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु नागरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.फोपसे यांनी केले.