महामार्गांच्या अर्धवट कामांवर आता आयुक्तांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 04:53 PM2020-10-19T16:53:21+5:302020-10-19T16:54:26+5:30
Highway Work राज्यभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत.
खामगाव : राज्यभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागांर्तंत सुरू असलेल्या सर्वच मार्गाच्या कामावर नजर ठेवण्यासोबतच त्या कामाच्या प्रगतीत असलेल्या अडचणी सोडवण्याचे काम आता विभागीय आयुक्तांच्या उपसमितीवर सोपवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या उपसमितीची रचना करण्यासोबतच कामकाजाचे दिशा निदेर्शही १६ आँक्टोबर रोजी दिले आहेत.
राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्याप्ौकी अनेक कामे संथगतीने सुरू आहेत. तर काही बंदही पडली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. तसेच मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या समस्येसंदर्भात मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांची ब्ौठक एप्रिलमध्येच पार पडली होती. त्यावेळी रस्ते बांधकामातील अनेक अडचणी समोर आल्या. त्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर उपसमितीचे गठण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. या समितीकडून मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेणार आहे.
- विभागीय उपसमितीची रचना
महामार्गांशी संबंधित विविध अडचणीकडे लक्ष देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली आहे. त्यामद्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, प्रादेशिक अधिकारी(मोर्थ), रस्ते विकास महामंडळ संबंधित विभागाचे मुख्य अभियंता, वीज कंपनीचे मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, मुख्य अभियंता(एमएसएसआरडीसीएल), वन अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.