आता शिवशाही बसेसही सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:46+5:302021-09-03T04:36:46+5:30
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध शिथिल झाल्याने हळूहळू एसटी बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. बसफेऱ्यांची संख्याही आता वाढविण्यात आली ...
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध शिथिल झाल्याने हळूहळू एसटी बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. बसफेऱ्यांची संख्याही आता वाढविण्यात आली आहे. लालपरी पाठोपाठ शिवशाही बसेसनेही पल्ला धरला आहे. जिल्ह्यातील पाच आगारांच्या १० शिवशाही बसेस रस्त्यावर धावत आहेत.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. कोट्यवधींचा तोटा महामंडळाला बसला आहे. आता एसटीची अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. सध्या पाच आगारातून शिवशाही बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. शिवशाही बसेसचे एकूण भारमान ३५ टक्के आहे.
बसेसचे होते नियमित सॅनिटाईज...
कोरोना कमी झाला आहे; परंतु संपलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत. सध्या शिवशाही बसेसमध्ये नियमित सॅनिटाईज करण्यात येत आहे.
शिवशाही बस आगारात आल्यानंतर एअरप्रेशरने संपूर्ण बस निर्जंतूक केली जात आहे. बसेसमध्ये एसी सुरू राहत असल्याने विशेष काळजी याठिकाणी घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातून सर्वाधिक शिवशाही बसेस या नागपूर आणि पुणेसाठी सोडण्यात येत आहेत. या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही बसेस
मार्ग बसेस
मलकापूर-नागपूर २
बुलडाणा-नागपूर २
चिखली - पुणे ४
खामगाव-अकोला १
शेगाव-अकोला १