आता प्रत्येक तलावावर राहणार कर्मचारी
By admin | Published: May 31, 2017 01:48 PM2017-05-31T13:48:04+5:302017-05-31T13:48:04+5:30
पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाºयांची काळजी घेणे, त्यावर निगराणीठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाचे नियोजन : जिल्हा परिषदेचा आपत्ती
व्यवस्थापन कक्ष कार्यान्वीत
बुलडाणा : पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाऱ्यांची काळजी घेणे, त्यावर निगराणी
ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागातील
उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलाव आपत्ती
व्यवस्थापनासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच पावसाळ्यात
ग्रामपंचायतींनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलावांवर ग्राम पंचायत
कर्मचारी नियुक्त करावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आगामी पावसाळ्यातील आपत्ती
संदर्भात संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले. तलाव भरला पण सांडवा
वाहत नसल्यास, सांडवा खचून काही मलबा जमा झाला, तलावाच्या भिंतीच्या पूर
पातळीवर पाणी जमा झाल्यास त्वरित संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी,
उपविभागीय अधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी. भिंतीतून पाझर
दिसल्यास, तलावाच्या भिंतीला भेगा किंवा भगदाड पडल्यास अशा धोकादायक
परिस्थितीत त्वरित प्रशासनाला सूचीत करण्यात यावे. यासाठी जिल्हास्तरावर
सिंचन विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा यांचे कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन
कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे, या कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.