आता वाहतूक नियम मोडल्यास होणार खिसा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:30+5:302021-09-05T04:38:30+5:30

यांच्यावर केली जात आहे कारवाई नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, भाई, दादा, भाऊ अशा फॅन्सी नंबर ...

Now if the traffic rules are broken, the pockets will be empty | आता वाहतूक नियम मोडल्यास होणार खिसा रिकामा

आता वाहतूक नियम मोडल्यास होणार खिसा रिकामा

Next

यांच्यावर केली जात आहे कारवाई

नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, भाई, दादा, भाऊ अशा फॅन्सी नंबर प्लेट लावणे, प्रेशर हॉर्न वाजविणे, सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनांवर ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई केवळ बुलडाणा शहरापर्यंत मर्यादित नसून, संपूर्ण जिल्हाभर राबविली जात आहे.

३० पोलीस कर्मचारी पथकात

वाहतूक पोलीस सध्या अलर्ट मोडवर असल्याने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पथकातील एकूण ३० पोलीस कर्मचारी कारवाईसाठी सध्या रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

नागरिकांना वाहतूक नियमांची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणात येऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल हा यामागील उद्देश आहे.

-ज्ञानेश्वर घुगे, पोलीस उपनिरीक्षक, बुलडाणा.

Web Title: Now if the traffic rules are broken, the pockets will be empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.