तूर खरेदीवर आता पुरवठा निरीक्षक व तलाठ्यांची नजर
By admin | Published: May 14, 2017 07:31 PM2017-05-14T19:31:19+5:302017-05-14T19:31:19+5:30
पंचनामा झालेल्या तूरीची १५ मे पर्यंत होणार मोजणी
Next
पंचनामा झालेल्या तूरीची १५ मे पर्यंत होणार मोजणी
बुलडाणा : जिल्ह्यात नाफेड केंद्रावर बाजार समिती संचालकांचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे ह्यकृऊबास संचालकांकडे तूर विक्रीची सेटिंगह्ण या मथळ्याखाली "लोकमत"ने १३ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार होऊ नये, म्हणून बुलडाणा येथील तहसिलदारांनी पंचनामा झालेल्या तूरीची १५ मेपर्यंत मोजणी करण्याचे आदेश देवून नाफेड केंद्रावर नजर ठेवण्यासाठी पुरवठा निरीक्षक व तालाठ्यांची नियुक्ती केली आहे.