आता खासगी नोंदणीकृत डॉक्टरांना लसीकरणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:54+5:302021-04-30T04:43:54+5:30

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी या ...

Now the opportunity to vaccinate privately registered doctors | आता खासगी नोंदणीकृत डॉक्टरांना लसीकरणाची संधी

आता खासगी नोंदणीकृत डॉक्टरांना लसीकरणाची संधी

Next

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी या विषयीचे एक पत्र २९ एप्रिल रोजी जारी केले आहे.

लसीकरण केंद्राच्या परवानगीसाठी खासगी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. लसीकरणासाठी तीन खोल्यांची मोकळी जागा, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, शीतसाखळीच्या उपकरणाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. सोबतच लसीकरणासंदर्भात शासनाच्या नियमाची पूर्तता संबंधितांनी केल्यानंतरच त्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात येणार आहे.

१ मे पासून लसीकरणाची वयोमर्यादा शासनाने अठरा वर्षे वयापर्यंत खाली आणली आहे.

त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेवरील आधीच वाढलेला भार कमी करण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे या माध्यमातून सहकार्य घेण्यात येणार असल्याचे एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे.

Web Title: Now the opportunity to vaccinate privately registered doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.