आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:21 AM2021-06-28T11:21:46+5:302021-06-28T11:21:58+5:30

Now the weekend is at home, the hotel will be closed : वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार असल्याने शहराचे रुळावर येणारे अर्थकारणही पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे. 

Now the weekend is at home, the hotel will be closed | आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : उन्यापुऱ्या जवळपास १५ दिवसांच्या अनलॉकनंतर जिल्ह्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आल्याने बुलडाणा शहरातील हॉटेलिंग व्यवसायालाही फटका बसणार आहे. वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार असल्याने शहराचे रुळावर येणारे अर्थकारणही पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे. 
बुलडाणा शहरात छोटी-मोठी मिळून जवळपास ३० च्या आसपास हॉटेल्स आहेत. त्याद्वारे जवळपास ३०० ते ४०० जणांना रोजगार मिळतो. बुलडाणा हे नोकरदारांचे शहर म्हणून अेाळखले जाते. शहरातील जवळपास ६६ टक्के नागरिक हे नोकरदार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एन्जाॅय करण्याची मानसिकता साधारणत: आढळते. त्यातल्या त्यात शहरातील २१ टक्के महिला नोकरी करतात. त्यामुळे हॉटेलमध्ये सुटीच्या दिवशी जेवणास जाण्याची एक पद्धत  २०१० च्या दशकामध्ये शहरात रुढ झाली.  
गेले वर्ष कोरोनाच्या धास्तीत गेले. कधी अनलॉक तर कधी लॉकडाऊन अशा चक्रात बुलडाणा शहरच काय संपूर्ण जिल्हा अडकलेला होता. गेल्या १५ दिवसांत हॉटेल, छोटी उपहारगृहे सुरू झाली होती. अर्थचक्र फिरावयास लागले होते. हॉटेल्सध्येही गर्दी वाढू लागली होती. मात्र, पुन्हा तिसऱ्या स्तराचे निर्बंध सोमवारपासून लागू करण्यात आल्यामुळे सकाळी ७ ते ४ या वेळेतच ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू राहतील. वीकेंडला मात्र हॉटेल्समध्ये जाऊन जेवण करण्याच्या मनसुब्यांवर आता पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसणार आहे.


५ कोटींची उलाढाल ठप्प
जिल्ह्यात छोटी-मोठी मिळून जवळपास ३ हजारांच्या आसपास हॉटेल्स असून त्यावर सुमारे ५ हजार जणांचे अवलंबित्व आहे. यामधून वर्षाकाठी ५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे हे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले आहे. आता वीकेंडलाही हॉटेलिंग बंद राहणार असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प होऊन घरातच वीकेंड साजरा करावा लागणार आहे.


१०५ लघु व्यावसायिकांचेही नुकसान
बुलडाणा शहरात १०५ लघु व्यावसायिक पाणीपुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे साधारणत: ३ व्यक्ती कामाला आहेत. शनिवार, रविवारला प्रामुख्याने यांचा व्यवसाय अधिक होतो. मात्र, आता वीकेंडला सर्वच बंद राहणार असल्याने त्यांच्यासमोरही समस्या आहेत.

Web Title: Now the weekend is at home, the hotel will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.