न.प. कर्मचार्यांचे सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:49 AM2017-08-10T00:49:50+5:302017-08-10T00:49:50+5:30
चिखली : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समिती संलग्नित नगर परिषद कर्मचारी संघटना चिखलीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

पालिकेचे मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एफ.बी. शिंगणे, उपाध्यक्ष जयेश खरात, कोषाध्यक्ष दिलीप इंगळे यांच्या नेतृत्वात सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचारी व सर्व सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, कर्मचार्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार चिखली यांना देण्यात येऊन, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २१ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मुख्याधिकारी वसंतराव इंगोले यांनी सहभाग नोंदवून मागण्यांबाबत संवेदनशीलता दर्शविल्याने हे एक दिवसीय आंदोलन यशस्वी ठरले.