सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:04+5:302021-02-26T04:48:04+5:30

...तर महिनाभर पुरेल ऑक्सिजन-- स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टची क्षमता ही २० केएल अर्थात २४०० जम्बो सिलिंडर एवढी आहे. हा ...

As the number of active patients increased, so did the demand for oxygen | सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली

सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली

Next

...तर महिनाभर पुरेल ऑक्सिजन--

स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टची क्षमता ही २० केएल अर्थात २४०० जम्बो सिलिंडर एवढी आहे. हा प्लॅन्ट कार्यान्वित झाल्यास त्यातील ऑक्सिजन हा महिनाभर पुरू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा प्लॅन्ट लवकरच कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. गेल्या ११ दिवसांत १,८०० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. परिणामी हा ऑक्सिजन टँक वेळेत सुरू होणे गरजेचे झाले आहे.

--मेडिकल इयरचा लाभ--

बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात टाटा ट्रस्टने पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधा उपलब्ध करताना ऑक्सिजनची गरज कशी कमी लागेल यादृष्टीने त्यात विचार करण्यात आला होता. त्यानुषंगाने रुग्णांना लावण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरला मेडिकल इयरची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज काही प्रमाणात कमी होते. या सुविधेचाही सध्या कोविड सर्मपित रुग्णालयात उपयोग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: As the number of active patients increased, so did the demand for oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.