बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दीड हजाराच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:02 AM2020-08-03T11:02:36+5:302020-08-03T11:02:54+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात आली असून एकूण बाधीतांची संख्या सध्या एक हजार ४९९ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात आली असून एकूण बाधीतांची संख्या सध्या एक हजार ४९९ झाली आहे. दरम्यान, रविवारी ५१ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ३०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
प्रयोगशाळा आणि व रॅपीड टेस्टचे एकूण ३५८ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३०७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी ४३ व रॅपीड टेस्टमधील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये बुलडाणा येथील चार, चांडोळ येथील एक, देऊळगाव राजा येथील एक महिला, लोणारमधील दोन, खामगावमधील ११, शेगावात एक, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ही एक, चांदुरबिस्वा येथे आठ, धानोरा खुर्द येथे पाच, नांदुरा शहरात आठ, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एक महिला, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे एक व्यक्ती, मोताला तालुक्यातील बोराखेडी येथे एक पुरुष, संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर येथे दोन, वरवट बकाल येथे एक तर सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथेही एक जण पॉझिटिव्ह आला आहे. चिखली तालुक्यातील दिवठाणा येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मुळची जालना जिल्ह्यातील पारध येथील रहिवासी असलेली एक संदिग्ध महिलाही बुलडाणा येथे कोरोना बादीत आढळून आली आहे. एकूण ५१ जण रविवारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
दुसरकीडे २१ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये नांदुरा येथील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील एक महिला, लोणार येथील एक व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील धाड येथीलही ेक व्यक्ती, दिवठाण्यातील एक महिला, चिखली शहरातील एक आणि तालुक्यातीचल ब्रम्हपुरी येथील एक जण कोरोना मुक्त जाला आहे. दरम्यान, लोणार तालुक्यातील सुतलानपूर येथील सुलतानपूर येथील चार पुरुष, एक महिला, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील एक महिला तर खामगाव शहरातील चार, मेहकरमधील एक आणि सिंदखे राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील एक पुरुष तर मोताला तालुक्यातील खरबडी येथील एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.
आतापर्यंत संदिग्ध रुग्णांपैकी नऊ हजार ५२९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून कोरोना बाधीत रुग्णांपैकी ८५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
अद्यापही १९१ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. वर्तमान स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ३९९ वर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या झाली आहे. पैकी ५१८ कोरोना बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यात ३० कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण बाधीतांची संख्या पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.