रोहयोच्या कामावर मजुरांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:33+5:302021-04-18T04:34:33+5:30
दरम्यान सध्या ४६५२ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहे. यामध्ये सर्वाधिक १०२२ मजूर हे संग्रामपूर तालुक्यात कार्यरत असून या तालुक्यात ...
दरम्यान सध्या ४६५२ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहे. यामध्ये सर्वाधिक १०२२ मजूर हे संग्रामपूर तालुक्यात कार्यरत असून या तालुक्यात ५० पैकी ३५ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. त्यानंतर मेहकर तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये ५७७ मजुरांना काम उपलब्ध करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये ५२२ कामे करण्यात येत आहेत. तुलनेने बुलडाणा तालुक्यात केवळ ९ ग्रामपंचायतींमध्ये ४७ कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा तालुक्यात दररोज २०० च्या आसपास कोरोना बाधीत आढळून येत आहे. १७ एप्रिल रोजी तर २५९ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्या परिणामही रोहयोच्या कामावर दिसून येत आहे. जिल्ह्यात रोहयोतंर्गत कामे उपलब्ध असून मजुरांनी ग्रामपंचायतस्तरावर कामाची मागणी करावी, असे आवाहनही रोहयोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
--चार कर्मचाऱ्यांना कोरोना--
रोहयोअतंर्गत कार्यरत असलेल्या तालुकास्तरावरील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाल्यामुळे संबंधित चार तालुक्यातील कामही प्रभावीत झाले आहे. येत्या काळात ही परिस्थिती सुधारेल असे सुत्रांनी स्पष्ट केले.
-- लोणार तालुका संवेदनशील--
मजुरांच्या स्थलांतराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोणार तालुक्यात ९ ग्रामपंचायतींअंतर्गत सुरू असलेल्या कामावर केवळ ८७ मजूर आहेत. त्यामुळे येथेही मजुरांसाठी कामे उपलब्ध करण्याची गरज आहे.