कामे प्रलंबीत राहण्याचे प्रमाण शुन्यावर आणणार- दिनेश गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 07:29 PM2020-10-31T19:29:06+5:302020-10-31T19:29:27+5:30
Buldhana News बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गेल्या १५ दिवसापूर्वी दिनेश गिते यांच्याशी केलेली बातचीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गेल्या १५ दिवसापूर्वी दिनेश गिते यांनी पदभार स्वीकारला. निवासी उपजिल्हाधिकारी या नावातच त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. त्यानुषंगाने ते महसूल व अन्य विभागात नवीन काय करणार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व विभागात समन्वय कसरा ठेवणार या संदर्भाने त्यांच्याशी केलेली बातचीत.
पदभार स्वीकारल्यानंतर आपण कोणत्या कामाला प्राधान्य दिले.?
शुन्य टक्के कामे प्रलंबीत राहतील यास आपण प्राधान्य दिले आहे. त्यानुषंगाने सहकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्या जाणून घेवून प्रलंबीत कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्या मार्गदर्शनात आपण ही कामे करणार आहोत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत.?
होय. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याही समस्या आहे. त्यांच्या सेवा विषयक समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे. या समस्या मार्गी लागल्यास कामाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी काय उपाययोजना आहे?
काळानुरूप प्रशासकीय सेवेत काम करताना आपले ज्ञान वृद्धिंग करावे लागते. त्यानुषंगाने कोतवाल ते तहसिलदार पदापर्यंतच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठीी प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करणार आहोत.
समन्वय समस्या आहे का?
नाही. सर्वांच्या समन्वयातून गुणात्मक काम करण्यावर भर आहे. लोकप्रतिनिधी पासून सामान्यांच्या सुचनांचे अवलोकन करून प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासोबतच नागरिकांची कामे सहजतेने होतील यास प्राधान्य देणार आहोत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात चाचण्यांचा वेग वाढवून कोरोना संसर्गाचे प्रमाण अचूक काढण्यास त्यामुळे मदत होत आहे. तसेच यंत्रणा अधिक सक्रीय व गतिमान करण्यास आपण प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले. एकट्या ऑक्टोबर महिन्यात जवळपास २० हजार चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या विकासासाठी व्हीजन डॉक्युमेंटद्वारे प्रयत्न करणार
महसूल विभागातील कोतवाल, तलाठी, कनिष्ठ लिपीक, मंडळ अधिकारी संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान वाढविण्यास प्राधान्य देणार आहोत. तसेच सर्व संवर्गातील कर्मचारी अधिकारी यांच्या सेवा विषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देवू.
कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी गुणात्मक दर्जाने करण्यासोबतच सर्व विभागाच्या समन्वयातून कामे प्रलंबीत राहणार नाहीत यासाठी प्राधान्याने प्रयत्न करून दुरवरून येणाऱ्यांचीही कामे तातडीने मार्गी लावणार- दिनेश गिते.