जिल्ह्यात प्रकल्पांची संख्या वाढतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:35 AM2021-02-16T04:35:38+5:302021-02-16T04:35:38+5:30
मका खरेदीसाठी ११ हजारांवर नोंदणी बुलडाणा : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीभावाने मका, ...
मका खरेदीसाठी ११ हजारांवर नोंदणी
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीभावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी करण्यात येते. मका खरेदीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. खरेदीची रक्कम रुपये २६.७ कोटी असून, त्यापैकी १५ कोटीपेक्षा अधिक रक्कम ही ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे.
तूर साेंगणीची कामे अंतिम टप्प्यात
सुलतानपूर : सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेवटचे पीक असलेल्या तुरीच्या साेंगणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहेत. यापूर्वी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तुरीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे, उत्पादनात घट हाेण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी तूर साेंगणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांची तूर काढणीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांच्या घरात माल आलेला आहे.
हाेम क्वारंटाईन रुग्णांच्या संख्येत वाढ
जानेफळ : पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढत आहे. हाेम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची माहिती आराेग्य विभागाला देण्यात येते. आराेग्य कर्मचारी हाेम क्वारंटाईन रुग्णांवर लक्ष ठेवतात. कुठलाही त्रास नसलेले रुग्ण असल्याने त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात बाेलावण्यात येते. आता जिल्ह्यात हाेम क्वारंटाईन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णही हाेम क्वारंटाईन हाेत असल्याचे चित्र आहे.