प्रयाेगशाळेत अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:06 AM2021-05-11T11:06:08+5:302021-05-11T11:06:23+5:30

Buldhana News :  अहवाल नियमित हाेण्यासाठी आणखी दाेन ते तीन दिवसांचा अवधी लागणार आहे़ .

The number of reports pending in the laboratory increased | प्रयाेगशाळेत अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले

प्रयाेगशाळेत अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मार्च महिन्यापासून क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या येत असल्याने बुलडाणा शहरातील काेराेना चाचणी प्रयाेगशाळा दाेन दिवस बंद ठेवण्यात आली हाेती़  त्यामुळे, प्रयाेगशाळेत सात हजारांपेक्षा जास्त स्वॅब प्रलंबित राहिले आहेत.  रात्रंदिवस तपासणी करून प्रलंबित स्वॅबची संख्या चार हजार आणण्यात येणार आहे़.  अहवाल नियमित हाेण्यासाठी आणखी दाेन ते तीन दिवसांचा अवधी लागणार आहे़ .
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़  त्यामुळे प्रशासनाने चाचण्या करण्यावर भर दिल्याने प्रयाेगशाळेवरील ताण वाढला आहे. प्रयाेगशाळेमध्ये एक हजार ते १२०० नमुन्यांची तपासणी सर्वसामान्य स्थितीत करणे शक्य आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढते काेराेना संक्रमण पाहता प्रयाेगशाळेत दाेन हजारपेक्षा जास्त स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.  प्रयाेगशाळेत आधीच ताेकडे मनुष्यबळ आहे़ त्यातच तपासणी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना काेरोनाने ग्रासले हाेते, तसेच तांत्रिक कारणांमुळे दाेन दिवस प्रयाेगशाळा बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे, प्रयाेगशाळेत जवळपास सात हजार स्वॅब प्रलंबित हाेते़  प्रयाेगशाळेचे कर्मचारी प्रलंबित स्वॅब कमी करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत असून, १० मे पर्यंत ३ ते ४ हजारावर प्रलंबित स्वॅब आणण्याचा प्रयत्न करीत आहेत़  येत्या दाेन ते तीन दिवसांत नियमित चाचण्यांचे अहवाल मिळण्यास सुरुवात हाेणार आहे़. 


दहा ते बारा दिवसांचा विलंब 
काेराेना रुग्ण वाढत असल्याने काेराेना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्हाभरातील काेविड सेंटरवरून गाेळा केलेल्या स्वॅबचा अहवाल १० ते १२ दिवसांनंतरही मिळत नसल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे स्वॅब दिलेले ग्रामस्थ गावभर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे़.

 
खामगावातील प्रयाेगशाळा लवकरच सुरू हाेणार 
बुलडाणा येथील प्रयाेगशाळेवर ताण वाढत असल्याने खामगाव येथे प्रयाेगशाळा सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या प्रयाेगशाळेसाठी तयारी पूर्ण झाली असून, येत्या ८ दिवसांत सुरू हाेणार आहे. त्यामुळे, खामगाव,  शेगाव, नांदुरा, जळगाव जामाेद,  संग्रामपूर तालुक्यातून येणाऱ्या स्वॅबचा ताण कमी हाेणार आहे. या तालुक्यातील  अहवालही लवकर मिळणार आहे़ त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाण कमी हाेणार आहे. 

 चाचण्या वाढल्याने   ताण वाढला आहे. दाेन दिवस तांत्रिक कारणांमुळे प्रयाेगशाळा बंद असल्याने अहवाल प्रलंबित आहेत.  कर्मचारी रात्रंदिवस काम करून प्रलंबित अहवाल कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  दाेन दिवसांत अहवाल नियमितपणे सुरू हाेतील. 
डाॅ. प्रशांत पाटील, प्रयाेगशाळा प्रमुख.

Web Title: The number of reports pending in the laboratory increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.