चंदनाच्या झाडांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:50+5:302021-07-27T04:35:50+5:30
हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल मेहकर : ११ महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त ...
हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल
मेहकर : ११ महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद पीक घेतले आहे. हळद लागवड १५ जूनपेक्षा उशिरा झाल्यास उत्पादनात घट येते.
नदी खोलीकरण कामाला फटका
हिवरा आश्रम : सुजलाम् सुफलाम् प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद सिंचन यांच्या कार्यक्षेत्रातील नदी खोलीकरण करण्यात आले होते. परंतु सलग दाेन वर्षांपासून नदी खोलीकरणाच्या कामाला कोरोनाचा फटका बसत आहे. यंदाही उन्हाळ्यात खोलीकरणाची कामे होऊ शकली नाहीत.
क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही रद्द!
बुलडाणा : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरदेखील होऊ शकले नाही. गेल्यावर्षीही कोरोनामुळे ही शिबिरे झाली नाहीत. सलग दुसऱ्या वर्षी क्रीडा शिबिरे रद्द झाल्याने खेळाडूंच्या कौशल्यावर परिणाम होत आहे.
शेतकऱ्याचे नुकसान, मदतीची प्रतीक्षा
सिंदखेडराजा : सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेडनेट उडून गेले होते. यामध्ये सावखेड तेजन येथील शेतकरी सुरेश किसन मांटे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदतीची प्रतीक्षा आहे.