जि.प.शाळेत विद्यार्थी संख्या खालावली!
By admin | Published: July 5, 2016 01:05 AM2016-07-05T01:05:48+5:302016-07-05T01:05:48+5:30
शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.
लोणार (जि. बुलडाणा): शाळा प्रवेशादरम्यान २७ जून रोजी विद्यार्थ्यांचे अभिनव उपक्रम राबवून स्वागत करण्यात आले. मात्र अपेक्षेप्रमाणे सुद्धा जि.प.शाळेत विद्यार्थ्यांंची प्र थमदिवशीच नाही तर अद्यापर्यंत विद्यार्थी संख्या दिसली नाही. यावर्षी तालुक्यातील शाळांमध्ये पटावरील विद्यार्थ्यांंची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. कॉन्व्हेंट संस्कृती, सिबीएसई पॅटर्न, खाजगी शाळा, यामध्ये देणार्या सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळांना घरघर लागल्याचे दिसत आहे. अनेक जिल्हा परिषद शिक्षक स्व त:च्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करत नसल्याने त्यांचाही स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास राहिला नाही असेच दिसत आहे. परंतु दुसर्याच्या पाल्यांना जि.प.शाळेत दाखल करण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप मात्र सुरु आहे. जि.प. प्रशासन शाळा टिकविण्यासाठी अभिनव प्रयोग करुन डिजीटल शाळा, सेमी इंग्लीश वर्ग, गणवेश वाटप, पुस्तक वाटप उपक्रम राबवित आहे. परंतु लोणार तालुक्यातील प्रशासन उपक्रम राबविण्यात अपयशी ठरत आहेत.