नर्सरी, केजीच्या सहा हजार विद्यार्थ्यांचे पुढील वर्षही घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:01+5:302021-05-27T04:36:01+5:30

बुलडाणा : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा वर्षभर बंदच राहिल्या. नर्सरीत प्रवेश झालेल्या चिमुकल्यांना ...

Nursery, KG's six thousand students at home next year | नर्सरी, केजीच्या सहा हजार विद्यार्थ्यांचे पुढील वर्षही घरातच

नर्सरी, केजीच्या सहा हजार विद्यार्थ्यांचे पुढील वर्षही घरातच

Next

बुलडाणा : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा वर्षभर बंदच राहिल्या. नर्सरीत प्रवेश झालेल्या चिमुकल्यांना स्कूल, टीचर, मॅडम भेटल्याच नाही अन्‌ शाळादेखील पाहायला मिळाली नाही. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता नर्सरी आणि केजीच्या मुलांना पुढील वर्षातही शाळेचे दर्शन होणे कठीण दिसत आहे. त्यामुळे नर्सरी आणि एलकेजी, युकेजीच्या सहा हजार मुलांचे पुढचे वर्षही घरातच जाणार असल्याची सध्या स्थिती आहे. कोरोनामुळे नर्सरी, बालवाडी, केजी, यूकेजी तसेच पहिली ते चौथीचे वर्ग भरलेच नाहीत. ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोगही फसला. शाळा सुरू नसल्याने होमवर्कचे बंधन राहिले नाही. मुले घरातच राहिली. मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेली. अभ्यास बाजूला राहिला. स्क्रीन टाइम जास्त झाल्याने डोके दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, मान दुखणे, स्थूलपणासोबतच चिडचिडेपणा वाढला आहे. बालवयात मुलांचा शैक्षणिक विकास तसेच व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असताना शाळा बंदमुळे या सर्व ॲक्टिव्हिटी बंद पडल्या आहेत.

शाळा सुरू हाेतील या आशेवर पालकांनी ऑनलाइन शिक्षणाला फारसा प्रतिसाद दिला नाही. तरीही आम्ही व्हिडिओ, ऑनलाइनद्वारे शिक्षण, विविध ॲक्‍टिव्हिटीवर भर दिला. नर्सरीतील मुलांच्या पालकांनी शाळा सुरू हाेण्याच्या भरवशावर न राहता पहिलीच्या वर्गासाठी पाया तयार करणे महत्त्वाचे ठरेल, त्यामुळे पुढे अवघड जाणार नाही.

संताेष गाेरे, सचिव, स्वामी विवेकानंद आश्रम

काेराेनामुळे या वयातील मुलांची शिक्षणात पीछेहाट झाली. मूलभूत पाया मुले विसरले. अभ्यासवाचून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. सध्या शाळा सुरू होणे शक्य नसल्या तरी नवीन शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षणात अभ्यासाबरोबरच मुलांचा शारीरिक, मानसिक विकास होण्यासाठीच्या योजना राबविणार आहोत.

डाॅ. सुभाष लाेहिया, संस्थाध्यक्ष

कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे वर्षही वाया जाणार आहे. शाळा बंद असल्याने अनेक शिक्षक, शिक्षिका पर्यायी काम, व्यवसाय करत आहेत. पालकही शाळेसाठी घेतलेले विविध पूरक कर्ज आणि व्याजामुळे मेटाकुटीला आले आहेत. येत्या वर्षात नर्सरी, केजी, केजीचे प्रवेश ऑनलाइन तत्त्वावर राहणार आहेत.

भूषण मिनासे,सचिव,

पालकही त्रस्त, कसा होणार बाैद्धिक विकास?

माझी मुलगी केजी टूमध्ये आहे. मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षण सुरू होते; पण डोके दुखणे व इतर त्रास झाला. सतत मोबाइल, टीव्हीवरील कार्यक्रमामुळे चिडचिडेपणा वाढला. त्यांची दोन वर्षे पीछेहाट झाली. मुले शाळेत गेले तरी लवकर सुधार होण्याची शक्‍यता कमीच आहे. वनिता झनके, पालक

माझा मुलगा केजी टूमध्ये आहे. शाळेचे क्लास ऑनलाइन हाेत असले तरी त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे, या क्लासचा फारसा फायदा झाला नाही. शाळा बंद असल्याने घरीच माेबाइल आणि टीव्ही बघण्यातच त्याचा वेळ जात आहे. काेराेनामुळे लहान मुलांच्या विकासावरही परिणाम हाेत असल्याचे चित्र आहे.

भारती वानखडे, पालक

माझ्या मुलाला यावर्षी नर्सरीमध्ये टाकण्याचा विचार सुरू आहे. मात्र, शाळा सुरू हाेईल किंवा नाही याची माहिती नाही. लहान मुलांना ऑनलाइन शिक्षण फारसे उपयाेगी ठरत नाही. त्यामुळे नर्सरीचे वर्ष घरीच जाण्याची भीती आहे.

किरण जाधव, पालक

शालेय जीवनाची सुरुवात या वर्गापासून हाेेते. लहान मुलांना सामाजिक जाणीव हाेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकास सुरू हाेताे. त्यामुळे, या शाळाच बंद असल्याने लहान मुलांचे माेठे नुकसान हाेत आहे. लहान मुले वर्षभरापासून घरातच आहेत. त्यामुळे, अतिचंचल मुलांचे आजार प्रकर्षाने जाणवत आहेत. काेराेनाविषयी सविस्तर माहिती त्यांना मिळत नसल्याने त्यांना आपण घरातच का आहाेत, असा प्रश्न पडत आहे. घरातच राहत असल्याने मानसिक आराेग्यवरही परिणाम हाेत आहे.

डाॅ. विश्वास खर्चे, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Nursery, KG's six thousand students at home next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.