कृषिविज्ञान केंद्रात पोषण महाअभियान, वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:38+5:302021-09-22T04:38:38+5:30
यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदी होते. याप्रसंगी आहारात विविध पौष्टिक धान्याचा वापर करण्याबाबत ...
यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदी होते. याप्रसंगी आहारात विविध पौष्टिक धान्याचा वापर करण्याबाबत उपाध्यक्ष कमल बुधवंत यांनी उपस्थितांना आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक यांनी कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी जैव समृद्ध धान्य व इतर पिकांबाबत मार्गदर्शन केले. स्नेहलता भागवत यांनी समतोल आहार व आरोग्य याबाबत, तर सहा. प्राध्यापक डॉ. दिनेश कानवडे यांनी भरड धान्याची पौष्टिकता याबाबत मार्गदर्शन केले. फळ पिकांचे आहारातील महत्त्व डॉ. अनिल तारू यांनी आपल्या मार्गदर्शनात समजावून सांगितले. सूत्रसंचालन मनेश यदुलवार यांनी, तर डॉ. नरेंद्र देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी बंधू-भगिनी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विषयतज्ज्ञ राहुल चव्हाण, पी. पी. देशपांडे, नितीन काटे, कोकिळा भोपळे, सुनीता थोटे, अनिल जाधव, नंदकिशोर ढोरे, संदीप तायडे, दिनेश चऱ्हाटे, अनुराधा जाधव व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पोषण जागरूकता विषयावर स्पर्धा
किशोरवयीन मुलींमध्ये पोषण जागरूकता या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमांमध्ये डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.