बाळाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द संगोपन आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:53 PM2019-09-07T14:53:00+5:302019-09-07T14:53:11+5:30
बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे.
खामगाव : बाल संगोपन हा तसा अत्यंत संवेदनशील विषय असून बालकाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द बाल संगोपन काळाची गरज आहे. प्रत्येक बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे.
आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील उत्कृष्ट क्षण असतो. मानसिक समाधन देणारा अत्यानंद असतो. म्हणून बालकांचे सु-संगोपन करताना आहार शास्त्राची माहिती करुन घ्यायला हवी. आजची मूलं देशाचे भावी - आधारस्तंभ असल्याने, प्रत्येकाच्या संगोपनावर काळजीपूर्वक भर देणे आवश्यक आहे. बाळाची वाढ होते तसे त्याच्या उंची व वजन याच्यात बदल होत जातात. ते प्रमाणात होत असेल तर बाळ सुदृढ होते. आवश्यक अन्न घटक रोज मिळतील आणि बालकांचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)