सिंदखेड राजा येथे ओबीसी बांधवांचा रास्ता रोको
By संदीप वानखेडे | Updated: December 10, 2023 18:34 IST2023-12-10T18:33:49+5:302023-12-10T18:34:18+5:30
गोपीचंद पडळकर यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध यावेळी करण्यात आला.

सिंदखेड राजा येथे ओबीसी बांधवांचा रास्ता रोको
सिंदखेडराजा : इंदापूर येथे ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. आंदोलनस्थली गेल्यानंतर पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. या घटनेचा रविवारी शहरात रास्तारोको आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी चप्पलफेक करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील बस स्थानकासमोर ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी काही वेळ रास्तारोको आंदोलन केले. "पडळकर हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. ते दूध संघाच्या आंदोलनाला भेट देण्यास गेले होते. मात्र, तेथे असलेल्या काही समाजकंटकांनी त्यांना तेथून जाण्यासाठी घोषणा दिल्या, तर अनेकांनी चप्पल फेकली. या घटनेने ओबीसी समाजात रोष असून, पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी," अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
दरम्यान, रास्तारोको आंदोलन झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.