शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्याचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:38+5:302021-01-01T04:23:38+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन २०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज दुरुस्त करून ऑनलाइन सादर करण्याकरिता मुदत देण्यात आली असून, या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.