मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!
By सदानंद सिरसाट | Updated: April 26, 2024 13:37 IST2024-04-26T13:37:03+5:302024-04-26T13:37:40+5:30
नवरदेवाने सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!
सदानंद सिरसाट, जळगाव-जामोद (खामगाव, जि. बुलढाणा) : मतदानाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात लग्नतिथी असल्याने लग्न असलेल्या नवरदेवांनी आधी मतदानाचा हक्क बजावण्याचे कर्तव्य पार पाडले. नवरदेवासह वऱ्हाडींनी मतदान करूनच लग्न करण्यासाठी ते रवाना झाले. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील सुमंत आनंदा देशमुख या नवरदेवाने सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला. नंतर आपल्या भावी जीवनाच्या वाटेवर वाट पाहणाऱ्या नवरीसोबत लग्न लावण्यासाठी रवाना झाला.
बुलढाणा सहा विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले हाेते. त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान झाले. बुलढाणा विधानसभा मतदार संघात १४.३१ टक्के, चिखलीत १७.७१ टक्के, जळगाव जामाेद १५.९३ टक्के, खामगाव १८. ३२ टक्के, मेहकर २२.४२ टक्के तर सिंदखेड राजा मतदार संघात १८.७० टक्के मतदान झाले आहे. सकाळी ९ वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडले आहेत. सकाळच्या सत्रात बुलढाणा लाेकसभा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.