सण ,उत्सवादरम्यान शासन निर्बंध पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:03+5:302021-09-07T04:41:03+5:30
सुलतानपूर : पोळा, गणेशोत्सव व इतर कार्यक्रमांदरम्यान नागरिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासन नियमांचे काटेकोर पालन ...
सुलतानपूर : पोळा, गणेशोत्सव व इतर कार्यक्रमांदरम्यान नागरिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासन नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे़ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी टाळण्याचे आवाहन मेहकर पोलीस स्टेशनला रूजू झालेल्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले़ ४ सप्टेंबरला सुलतानपूर येथे शांतता समितीची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती़ यावेळी परदेशी बाेलत हाेत्या.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची काही दिवसांपूर्वी मेहकर पो. स्टे. झाली असून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देत परिस्थिती जाणून घेत आहेत़ मेहकर पोलीस स्टेशन अंर्तगत सुलतानपूर बिट हे सर्वांत मोठे आहे़ त्या अनुषंगाने त्यांनी सुलतानपूर, अंजनी खुर्द, शिवणीपिसा, धानोरा-राजनी आदी गावांना भेटी दिल्या व तेथील नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली़ यावेळी काँग्रेसचे वामनराव झोरे, शिवसेनेच्या आशाताई झारे, भाजपचे मारोतराव सुरूशे , उपसरपंच प्रदीप सुरूशे, तं.मु. अध्यक्ष राजेश भानापुरे, माजी सरपंच सलीमखा पठाण, सुखदेवराव देसाई, पुरुषोत्तम गाडेकर, पो. पा. पती राजेश भानापुरे ग्रा. पं. सदस्य शे. अजहर, जाकिर पठाण, दामोदर सुरूशे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव झोरे, सुरेश मोरे, भीमराव भोसले, ग्रा. वि. अ. संतोष क्षीरसागर, मारोती अवचार, अशोक जावळे, गोपाल शेळके, महेंद्र पनाड व पोहेकॉ प्रभाकर सानप, पोकॉ राजेश जाधव, पॉकॉ लोढे, पोकॉ घुगे सह सुलतानपुर येथील नागरिक उपस्थित होते़