शासकीय कामात अडथळा, आठ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:42+5:302021-05-14T04:34:42+5:30
येथील शेख रियाज शेख सुभान यांनी त्यांच्या मालकीच्या सहा बकऱ्या (किंमत अंदाजे ५१ हजार रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची ...
येथील शेख रियाज शेख सुभान यांनी त्यांच्या मालकीच्या सहा बकऱ्या (किंमत अंदाजे ५१ हजार रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन बिबी येथे २० एप्रिल रोजी दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
बकऱ्या चोरून नेणारे आरोपी पोलीस स्टेशन बीबी हद्दीतील खापरखेड घुले येथील असल्याची माहिती १३ मे रोजी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम व्यवहारे पोलीस अंमलदार खापरखेड घुले येथे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपी गणेश संतोष राठोड, संतोष विष्णू राठोड, काळू चंदू राठोड, गजानन विष्णू राठोड, चंदू रामचंद्र चव्हाण, बाळू विष्णू राठोड, रामनारायण डिगांबर चव्हाण, दीपक सुरेश राठोड, सुरेश अंकुश डोंगरे, ज्ञानेश्वर मोहन राठोड, ज्योती चंदू राठोड, मीना सुभाष चव्हाण, विलास चव्हाण यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला. तसेच चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यास हरकत केली आणि कोविड-१९ संदर्भाने शासन नियमांचे उल्लंघन केले. त्यावरून पोलीस स्टेशन बीबी येथे अंमलदार पो.ना. अर्जुन सांगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खापरखेड घुले येथे अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करून आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एल.डी. तावरे ठाणेदार करीत आहेत.