रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:02 PM2017-08-08T20:02:47+5:302017-08-09T00:42:58+5:30
डोणगाव (बुलडाणा): येथील श्री विठ्ठल रूख्माई शाळेच्यावतीने रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शैलेश सावजी होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव मानवतकर होते. यावेळी मुख्याध्यापक आत्माराम दांदडे व हेमंत जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश सावजी म्हणाले, की रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांने ज्या झाडाला राखी बांधली, त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. संचालन संजीव भारते यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दांदडे यांनी केले.