खेळाडुंना सवलतींच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:35 AM2020-05-04T10:35:22+5:302020-05-04T10:35:30+5:30

आता १३ मे पर्यंत आॅनलाइन प्रस्ताव सादर करता येणार आहे.

Offer increased points of concessions to players online | खेळाडुंना सवलतींच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन

खेळाडुंना सवलतींच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: माध्यमिक, उच्च माध्यमिक परिक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडूंना सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता १३ मे पर्यंत आॅनलाइन प्रस्ताव सादर करता येणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ठ होणाºया जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेस प्रविष्ठ होणाºया खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे ३० मार्च २०२० पर्यंत सादर करावे लागणार होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खेळाडू क्रीडा गुण प्रस्ताव आॅनलाईन तयार करुन, त्या प्रस्तावाची प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे १३ मे पर्यंत सादर करावी लागणार आहे. यापुर्वी ज्यांनी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले असेल, त्यांनी ती प्रत या कार्यालयास देणे बंधनकारक आहे. एकविध खेळ संघटना यांनी दहावी, बारावीच्या परिक्षेस प्रविष्ट होणाºया खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीत शासन निर्णयानुसार एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य संघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांना स्पर्धा विषयक अहवाल १० मेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

वेळेत प्रस्ताव न आल्यास संघटना जबाबदार
जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचा संपुर्ण अहवाल, सहभागी संघाची यादी, सहभागी खेळाडूंची यादी, स्पर्धेची भाग्यपत्रीका, स्पर्धेचे अंतीम निकाल, आयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांची सही व शिक्कासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र, आदी सर्व कागदपत्र एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर करणे आवश्यक आहे, अशा सुचना जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिल्या.

Web Title: Offer increased points of concessions to players online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.