अधिकारी गैरहजर; नागरिक ताटकळत!

By admin | Published: September 22, 2015 02:00 AM2015-09-22T02:00:01+5:302015-09-22T02:15:49+5:30

शासकीय कार्यालयातील अधिकारी नेहमीच कामाच्या वेळेत गैरहजर असल्याने नागरिकांना तासनतास करावी लागते प्रतीक्षा!

Officer absent; Citizens! | अधिकारी गैरहजर; नागरिक ताटकळत!

अधिकारी गैरहजर; नागरिक ताटकळत!

Next

बुलडाणा : येथील शासकीय कार्यालयातील अधिकारी नेहमीच कामाच्या वेळेत गैरहजर राहतात. परिणामी नागरिकांना कार्यालयातील रिकाम्या खुच्र्यांकडे पाहत कक्षाबाहेर ताटकळत बसावे लागते. लोकमत न सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आले. पोळ्यानिमित्त दोन दिवस सुट्या, त्यानंतर तब्बल चार दिवस अतवृष्टी, गणेश चतुर्थी व गौरपूजन यामुळे प्रशासकीय कामकाज तब्बल आठवड्याभरापासून खंडित होते. त्यामुळे बहुदा नागरिकही कार्यालयांकडे भटकले नाहीत; मात्र दुसर्‍या आठवड्यातील सोमवारी बर्‍याच शासकीय कार्यालयात विविध कामे घेऊन आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कामे घेऊन आलेल्या नागरिकांची बाहेर गर्दी असतानाही कार्यालयातील बरेच कर्मचारी मात्र गैरहजर होते. त्यांच्या रिकाम्या खच्र्या पाहून नागरिकांना मात्र त्यांच्या येण्याची प्रतीक्षाच करावी लागली. सर्वच शासकीय कार्यालयात हा प्रकार आज आढळून आला. येथे कामानिमित्त आलेले नागरिक तासनतास रांगेत उभे होते; मात्र वेळेपर्यंत कर्मचारी न आल्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहिली. ग्रामीण भागातील नागरिकांना येथे दिवसभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने वेळ आणि श्रम याचा अपव्यय होतो. आता शेतीचा हंगाम असल्याने अनेकदा ग्रामस्थांना कार्यालयात येणे शक्य होत नाही; मात्र ऐनवेळी कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागले.

Web Title: Officer absent; Citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.