सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:52 PM2019-11-29T13:52:42+5:302019-11-29T13:53:10+5:30

अपेक्षीत जनजागृती अभावी  शेतकऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली.

Officers more than farmers for workshop! | सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त!

सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त!

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  तालुका  आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने खामगाव येथे शुक्रवारी आयोजित सुसंवाद कार्यशाळेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अपेक्षीत जनजागृती अभावी  शेतकऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली. गर्दी जमत नसल्याने कृषी विभागाकडून वेळेवर शेतकºयांना संपर्क साधण्याचा केविलवाणा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता खामगाव येथील कोल्हटकर सभागृहात खामगाव तालुका आणि परिसरातील शेतकºयांसाठी कृषी सुसंवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कृषी विभागाच्यावतीने अपेक्षीत जनजागृती आणि शेतकºयांशी संपर्क साधण्यात आला नाही. त्यामुळे या सुसंवाद कार्यशाळेकडे अनेक शेतकºयांनी पाठ फिरविली. शेतकरी येत नसल्याचे निदर्शनास येताच कृषी विभागाच्यावतीने समूह सहायक, कृषी सहायक, कृषी मित्र आणि कृषी साहित्य विक्रेत्यांना वेळेवर निरोप देण्यात आले आणि सभागृहात गर्दी जमविण्यात आली.  त्यानंतर दुपारी १२ वाजता नावापुरता हा सुसंवाद कार्यक्रम राबविण्यात आला.

 
शेतकऱ्यांपेक्षा अधिकारी आणि कर्मचारीच अधिक!
शुक्रवारी खामगाव येथे पार पडलेल्या कृषी सुसंवाद कार्यशाळेला शेतकºयांपेक्षा अधिकाºयांचीच संख्या अधिक होती. यावेळी जळगाव कृषी विद्यापीठाच्या व्याख्यात्यांसह खामगाव तालुका कृषी कार्यालयाचे मंडळ अधिकारी पवार, दहीफळे, ईटे, देशमुख, दाते, भागवतकर, पडवाळ, भवर, सवडतकर, अवचार, दांडगे, डाखोरे, घुले, काकड, जाधव आदी अधिकारी आणि शेतकरी, समूह सहायक, कृषी सहायक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अवघे ०७ शेतकरी उपस्थित होते.

 

 
कृषी विभागाच्या सुसंवाद कार्यशाळेसंबंधी कोणतीही माहिती आपणास नव्हती. महसूल कार्यालयात काही कामानिमित्त आलो असता, कृषी विभागाचे अधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन आले. आमच्या गावातही याबाबत कृषी विभागाकडून निरोप देण्यात आलेला नाही.
- ए.एस.आखरे
शेतकरी, बोरीअडगाव.

 

 कृषी विभागाकडून शेतकºयांना निरोप देण्यात आले आहेत. कदाचित कार्यशाळेची वेळ आणि दिवस चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांच्या हजेरी पुस्तिकेवर तारीख नसल्याचा प्रकार गंभीर असून संबंधितांना तशी विचारणा केली जाईल. यासंपूर्ण प्रकाराची माहितीही घेतली जाईल.
- नरेंद्र नाईक
जिल्हा कृषी अधिक्षक, बुलडाणा.

Web Title: Officers more than farmers for workshop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.