पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कामुळे खामगाव पालिकेतील लोकप्रतिनिधींसह अधिकारी क्वारंटीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:31 PM2020-07-07T17:31:20+5:302020-07-07T17:32:01+5:30
पॉझिटिव्ह रूग्णाच्या हायरिस्क संपर्कात आल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिंधीचा जीव टांगणीला लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत दहा दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. खामगाव शहरातील रूग्णांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. एका प्रतिष्ठिता पॉझिटिव्ह रूग्णाच्या हायरिस्क संपर्कात आल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिंधीचा जीव टांगणीला लागला आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कातील काही जण पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागल्याची चर्चा आहे.
खामगाव शहरातील एका प्रतिष्ठित वृध्द इसमाचा नुकताच मृत्यू झाला. उपचार सुरू असताना या वृध्दाचा स्वॅब घेण्यात आला. या व्यक्तीचा स्वॉब पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील ७-८ जणांचे स्वाब घेण्यात आले. यापैकी चौघांचे स्वॅब नमुणे पॉझिटिव्ह आले. तर दुसऱ्या भागातील चौघांचे असे सोमवारी एकाच दिवशी ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका प्रतिष्ठित रूग्णाच्या नातेवाईकाच्या हायरिक्स संपर्कात आल्याने खामगाव पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिकेतील पदाधिकारीही अडचणीत सापडले आहेत. पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह काही अधिकारी, कर्मचारी आणि पालिका पदाधिकारी आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले. तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांनी स्वत:हून स्वत:ला क्वारंटीन करून घेतले आहे. क्वारंटीन करण्यात आलेल्यांची आकडेवारी ३४ च्यावर पोहचली असल्याचे एका अधिकाºयांने सांगितले.
(प्रतिनिधी)